Saturday , June 3 2023
Breaking News

घोटाळेबाज विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर आता 17 फेब्रुवारीला सुनावणी

पनवेल : प्रतिनिधी
बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अजूनही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता 17 फेब्रुवारी 2022 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
मुंबईच्या सत्र न्यायालयात मंगळवारी (दि. 8) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अ‍ॅड. गोन्साल्वीस उपस्थित होते. ईडी अधिकारी प्रेमसिंग मीना व्हीसीद्वारे सुनावणीच्या वेळी उपस्थित होते. विवेक पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. राहुल ठाकूर हजर होते. या वेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी केलेल्या विनंतीमुळे न्यायालयाने पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, कर्नाळा सहकारी बँकेच्या बंद होत असलेल्या शाखांबाबत व्यवस्थापनासंदर्भातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणताही संपर्क होऊ शकला नाही, मात्र सहकार खात्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनीही यावर बोलण्यास नकार दिला.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply