Breaking News

भाजप दक्षिण भारतीय सेलच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप दक्षिण भारतीय सेल रायगड जिल्हा नवीन कार्यकारिणी सदस्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

दक्षिण भारतीय रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली होती. या नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम रविवारी (दि. 8) झाला. यामध्ये पनवेल शहर मंडलचे आनंद शेरावत, खारघर मंडलचे अंमरनाथ हालेंबर, कामोठे मंडलचे चेतन शेट्टी, नवीन पनवेल मंडलचे रवींद्र पिल्लाई, धनंजय शेट्टी, खोपोली मंडलचे पी. के. श्रीजीथ, रोडपाली (कळंबोली) मंडलचे सुभाष बाबू, विचूंबे (पनवेल ग्रामीण) मंडलचे अबुथाहिर कोलायील, उलवे (पनवेल ग्रामीण आणि उरण) मंडलचे राजेश सुंदरम, कर्जत मंडलचे श्रीनिवास राव, सोशल मीडिया सदस्य योगेश कुटीदरा, साविना भगेरा या नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात पनवेल महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी, दक्षिण भारतीय सेलचे जिल्हा संयोजक श्रीनिवास कोडुरू, सतीश राजु, सातानाथ शेट्टी, शामला शेट्टी, रामकृष्णन नायर, अक्षय क्षणभुगम, सुजित पुजारी, अनसर आली आदी उपस्थित होते.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply