लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
करंजाडे येथे श्री समर्थ कृपा डीएक्सएन हेल्थ सेंटर नव्याने सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थित रविवारी (दि. 8) झाले. तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही या सेंटरला भेट देत शुभेच्छा दिल्या.
या वेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक विनोद साबळे, भाजप करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, डीएक्सएनचे प्रतिनिधी अनिल भोसले, तानाजी शेलार, मंगेश शेलार, जिनेश शेलार, कैलास कर्णा शेलार, सुनिल साबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डीएक्सएनच्या स्टोकिस्ट कांचन भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.