Breaking News

पनवेलमध्ये उद्या ‘मेरी आवाज ही पहचान है’

स्व. लतादिदींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आणि सोनेरी आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी (दि. 24) रात्री 8 वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’मेरी आवाज ही पहचान है’ या सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा, भारत विकास परिषद, रंगनिल संस्था, रंगरचना कलामंच, संस्कार भारती पनवेल समिती आणि पनवेल कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सामगंध कला केंद्र पनवेल हे सादरकर्ते आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोफत प्रवेशिका अमोल स्टेशनरी, टिळक रोड, पनवेल (संपर्क क्रमांक 9820233349) येथे उपलब्ध आहेत.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply