Breaking News

राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत पनवेलचा पारस भोईर द्वितीय

मुंबई ः प्रतिनिधी

क्रीडाप्रेमी सुरेश आचरेकर स्मृती अखिल भारतीय 14 वर्षाखालील ऑनलाइन मोफत बुद्धीबळ स्पर्धेत आंध्रप्रदेशच्या अशोककुमार सरागडाने साखळी नऊ फेर्‍यांमध्ये सर्वाधिक आठ गुण घेत निर्विवाद प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांकासाठी तामिळनाडूच्या के. पी. प्रणव आणि मुंबईच्या श्रेयांश सोमैयाचे समान सात गुणांचे आव्हान सरस सरासरीच्या बळावर मागे टाकत पनवेलच्या पारस भोईरने बाजी मारली. परिणामी प्रणवला तृतीय, तर सोमैयाला चतुर्थ क्रमांकाच्या पुरस्कारावर समाधान मानावे लागले.  अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आत्माराम मोरे प्रतिष्ठान, इन्स्टिट्यूट फॉर चेस एक्सलन्स, आरएमएमएस, स्वराज्य फौंडेशनतर्फे तीन बुद्धीबळ स्पर्धांची मालिका विनाशुल्क आयोजित करण्यात आली होती. शेवटच्या स्पर्धेत महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, उत्तरप्रदेश, आसाम, गुजरात आदी राज्यातील नामवंत सबज्युनियर बुद्धीबळपटूंनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये मुंबईच्या जयवीर पाटीलने (6.5 गुण) पाचवा, मुंबईच्या प्रथमेश गावडेने (6 गुण) सहावा, पनवेलच्या जयराज निवातेने (6 गुण) सातवा, मुंबईच्या अंशुमन समलने (6 गुण) आठवा, आसामच्या भारसिता सहारियाने (6 गुण) नववा तर मुंबईच्या गुरुप्रसाद कुळकर्णीने (6 गुण) दहावा पुरस्कार मिळविला. विजेत्यांचे संघटन समितीचे सहसचिव सुभाष आचरेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण व एमसीडीसीएचे सेक्रेटरी राजाबाबू गजंगी यांनी अभिनंदन केले. मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटना सहकार्यीत तीन स्पर्धांच्या मालिकेतील तिन्ही टॉप-10 विजेते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स विजेतेपदासाठी 14 व 15 ऑगस्ट रोजी झुंज देणार आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply