रोहे : प्रतिनिधी
येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून, मंगळवार (दि. 10)पर्यंत रोहा तालुक्यतील 33हजार 231 नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय ससाने यांनी दिली.
रोहा तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, गर्दी करू नये असे सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. रोहा तालुक्यातील आंबेवाडी, धाटाव, संभे, कोकबन, घोसाळे, नागोठणे, ऐनघर, पळस, यशवंतखार, खांब, मेढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक सभागृहात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तेथे एकूण 33हजार 231 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
केंद्र पहिला डोस दोन्ही डोस एकूण
आंबेवडी 3618 1281 4889
धाटाव 535 55 590
संभे 412 78 490
कोकबन 3583 1026 4609
घोसाळे 629 47 676
नागोठणे 3218 1563 4781
ऐनघर 258 42 300
पळस 189 21 210
यशवंतखार 219 01 220
खांब 224 56 280
मेढा 268 03 271
रोहा शहर 10278 5637 15915
एकूण 23431 9800 33231