Monday , February 6 2023

मुंबईमध्ये डेल्टा प्लसचा पहिला बळी

मुंबई ः प्रतिनिधी

मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. घाटकोपरमधील एका 63 वर्षीय महिलेचा कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीतील एका 80 वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे 13 जून रोजी मृत्यू झाला होता. मुंबईतील या महिलेचा मृत्यू डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याची माहिती 11 ऑगस्ट रोजी समोर आली आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये हा खुलासा झाला. आता या महिलेच्या संपर्कात आलेल्या दोघांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply