Breaking News

नवीन पनवेल येथे योग दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

इन्स्टिट्यूट ऑफ योग व आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती, पनवेल यांच्या पिल्लई कॉलेज, नवीन पनवेल येथे चालणार्‍या योग वर्गामध्ये 21 जून हा जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवातीला कार्यक्रम प्रमुख सुधा मोकल यांनी आरोग्य सेवा समितीतर्फे उपस्थितांचे स्वागत केले. तर जगन्नाथ देशमुख यांनी आपल्या सहकार्यांच्या सहाय्याने योगासनांची प्रात्यक्षिके घेतली. कार्यक्रमाला माजी उपमहापौर चारुशीला घरत आणि डॉ. शिंदे उपस्थित होते. सुधा मोकल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिल्यानंतर नवीन पनवेल केंद्र प्रमुख गीता गुप्ता यांच्या हस्ते योगपात्री हे पुस्तक देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. भाषणात नगरसेविका चारुशीला घरत आणि डॉ. तुकाराम शिंदे यांनी नियमित योग साधनेचे महत्त्व पटवून देत आलेले अनुभव कथन केले व विद्यार्थ्यांबरोबर योगासने करून योगदिन साजरा केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवीन पनवेलचे केंद्रप्रमुख गीता मॅडम आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply