खारघर भाजपतर्फे माजी सैनिक, कोरोना योद्ध्यांचा सन्मान
खारघर : रामप्रहर वृत्त
भाजप खारघर मंडलच्या माध्यमातून दरवर्षी राष्ट्रीय सण उत्साहात साजरे केले जातात. सालाबादप्रमाणे याहीवर्षी आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयासमोर माजी सैनिक गजेसिंह व थम्पीयाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कोरोना योद्धे यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आले.
खारघर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. भागवत जायभाय, डॉ. ललित शहा, डॉ. शुभम पटेल, डॉ. पूनम जाधव, डॉ.वर्तिका, डॉ. सोनाली कालगुडे, डॉ.मिनी नायर, डॉ. भरत पटेल, डॉ.किरण कल्याणकर तसेच आशा सेविका ऋतुजा शेपुंडे व प्रमिला घरत यांनी कोरोना महामारीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सर्वांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दिपक शिंदे, पनवेल महानगरपालिका प्रभाग ’अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, उत्तर रायगड सचिव गीता चौधरी, संध्या शारबिद्रे, माजी सैनिक सेल संयोजक गजेसिंग, उपाध्यक्ष संजय घरत, बीना गोगरी, सोशल मीडिया सेलच्या मोना अडवाणी, खारघर मंडल सोशल मीडिया संयोजक अजय माळी, वाहतूक सेल संयोजक रामकुमार चौधरी, प्रसिध्दी प्रमुख प्रभाकर बांगर, माथाडी युनियन सचिव अनिल खोपडे, वकील सेल नरेंद्र बाबरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय पाटील, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, सत्यपाल चुघ, चिटणीस स्मिता आचार्य, निलम विसपुते, शोभा मिश्रा, विजयालक्ष्मी सरकार, वॉर्ड 4च्या अध्यक्षा आशा शेडगे, सेक्टर अध्यक्ष अश्विनी भुवड, प्रिया दळवी, राजेश्री नायडू, गुरुनाथ म्हात्रे, अशोक जांगिड, राम जाधव, अशोक पवार, उत्तम शेडगे, प्रदीप शेलार, एस. के. डोळस तसेच सोबत रहिवाशी व कार्यकर्ते उपस्थित होते.