Breaking News

पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त
पुढील महिन्यात पनवेल अर्बन बँकेची निवडणूक असून या निवडणुकीकरिता भरतीत जनता पक्षाच्या उमेदवारांनी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 27) आपले उमदेवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी पनवेल तालुका व शहर भाजपच्या कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सचिन पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, शहर सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, मनोहर म्हात्रे, बबन मुकादम, अमर पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, प्रदीप भगत, मुकीत काझी, माजी नगरसेविका नीता माळी, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा नेते विनोद साबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते कर्णा शेलार, प्रभाकर जोशी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, नंदकुमार म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
एकूण 13 जागांसाठी ही निवडणूक होणार असून सर्वसाधारण आठ, महिला प्रतिनिधी दोन, अनुसूचित जाती- जमाती एक, इतर मागास एक, भटक्या विमुक्त जमाती मागास प्रवर्ग एक अशा जागांचा समावेश आहे. नामनिर्देशन दाखल करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर होती. नामनिर्देशन पत्राची छाननी 28 ऑक्टोबरला, तर 31 ऑक्टोबरला वैध नामनिर्देशित पत्राची सुची घोषित होणार आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबरला निशाणीचे वाटप, 27 नोव्हेंबरला मतदान तर 28 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीतील सर्वसाधारण जागेसाठी अजय यशवंत कांडपिळे, बळीराम नारायण म्हात्रे, यतीन शशिकांत देशमुख, श्रीनंद मुकुंद पटवर्धन, भगवान तुकाराम मुकादम, असिफ हसन करेल, कृष्णा सिताराम पाटील, भगवान शंकर पाटील, महिला प्रतिनिधी म्हणून प्रमिला जयराम मुंबईकर, निकिता निवृत्ती नावडेकर, अनुसूचित जाती जमाती जागेसाठी महेंद्र जानू गायकवाड, इतर मागासवर्गीय जागेसाठी प्रल्हाद गोविंद केणी, भटक्या विमुक्त जमाती जागेकरिता सुहासिनी दिनेश केकाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पनवेल अर्बन बँकेचा उत्कर्ष झाला पाहिजे, यासाठी निवडणुकीत भाग घेत आहोत. सर्वानी मेहनत घेऊन हि निवडणूक जिंकू या. आपले सर्व उमेदवार आणि त्यांचे सहकारी यांना विजयासाठी शुभेच्छा.
– आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष भाजप, रायगड

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply