Breaking News

गोरगरिबांना अन्नधान्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन जारी केले आहे. या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने  भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, गोरगरिबांना हाताला काम नाही आणि काम नसल्यामुळे हातात पैसे नाही. त्यामुळे आय फ्लेक्स टेक्नॉलॉजीसचे डायरेक्टर रणजित मच्छिंद्र नरुटे यांच्या माध्यमातून पनवेल या ठिकाणी गोरगरीबांना अन्न धान्य वाटप केले.

या वेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, घरीच राहा सुरक्षित रहा आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला अजून सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. एक हात मदतीचा अनेक चेहरे आनंदाचे असा संदेश रुजविण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply