Breaking News

जीवनज्योती वृद्धाश्रमांमध्ये कोविड लसीकरणाचे विशेष सत्र

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेच्या वतीने खारघर येथील जीवनज्योती वृद्धाश्रमांमध्ये विशेष कोविशिल्ड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 33 ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.

महापालिकेच्या वतीने लसीकरणास गती दिली जात असून समाजातील सर्व घटकांना लसीकरणामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा चांडक यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन केले. या वेळी खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची लसीकरण टीम उपस्थित होती.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply