Breaking News

18000 फूट उंचीवर लोकनेते दि. बा. पाटील यांचा जयजयकार

नेरळ, बदलापूरमधील तरुणांनी झळकावला फलक

कर्जत : बातमीदार

नेरळ आणि बदलापूर अभियंते असलेल्या सहा तरुणांनी लेह लडाखला जाऊन समुद्र सपाटीपासून 18 हजार फूट उंचीवर असलेल्या खरडुंगला पास येथे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा जयजयकार केला. तेथे या तरुणांनी तिरंगा झेंडा फडकवत ‘दिबां’चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, या मागणीसाठी फलक झळकावला.

अभियंते असलेले रोहित चंचे, जयेश कालेकर, हर्षल घोरपडे, निखिल घोरपडे, कांतीलाल चौधरी आणि मुरलीधर सूर्यराव हे तरुण पर्यटनासाठी लेह व लडाख परिसरात गेले होते. तेथील 17,982 फूट उंचीवरील खारडुंगला पास येथे या तरुणांनी भारताचा तिरंगा फडकवत जल्लोष केला, तसेच नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, असा फलक लावला.

या तरुणांनी तेथे जमलेल्या पर्यटकांना दि. बा. पाटील यांच्या कार्याची महती सांगून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणे कसे योग्य आहे हेही सांगितले.

संधी मिळेल तेथे आम्ही नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करू.

-जयेश कालेकर, सिव्हिल इंजिनिअर, नेरळ भडवळ, ता. कर्जत

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply