Breaking News

चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीकडून रोगराईला आमंत्रण?

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील शहरालगत असणार्‍या चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वेळीच घनकचरा उचला जात नसल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.चिपळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे कोप्रोली येथील क्वालिटस गार्डन को ऑपरेटिव्ह हौसिंग या 232 मध्यमवर्गीय सदनिकाधारकांचा या सोसायटीतच कचर्‍याचा ढीग गेल्या 15 दिवसांपासून कुजलेल्या अवस्थेत पडला आहे. ग्रामपंचायतीकडे सोसायटीतील लोकांनी वारंवार विनंती करून ही ग्रामपंचायतीने कचर्‍याची विल्हेवाट लावण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत सोसायटीतील नागरिकांनी आपल्या कचर्‍याची स्वतःच विल्हेवाट लावावी, असे अजब लेखी पत्राने उत्तर दिले आहे. या घाणीमुळे रोगराई होवू शकते. कोरोनाकाळात या घाणीमुळे सोसायटीतील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाल्यास चिपळे ग्रुप ग्रामपंचायत त्यास जबाबदार राहील काय, असा सवाल सोसायटीतील नागरिकांना पडला आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply