पनवेल : रामप्रहर वृत्त
सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी संध्या या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून खारघर भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 18) सायंकाळी 7 वाजता खारघरमधील गावदेवी मैदानावर हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात ‘राधा ही बावरी’ फेम सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, गायक के.शिरीष, गायिका गुल सक्सेना आणि सपना हेमन याांचे गीत सादरीकरण होणार आहे.
भाजपतर्फे दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणाच्या निमित्ताने संगीत, संस्कृती आणि कलेचा संगम साधणारा दिवाळी संध्या कार्यक्रम रसिकांसाठी खर्या अर्थाने सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांगीतिक आनंद घ्यावा, असे आवाहन भाजपचे खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील व पदाधिकार्यांनी केले आहे.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper