Breaking News

पनवेलमध्ये गरिबांसाठी सुरू होणार अन्नछत्र

भाजपच्या सूचनेची आयुक्तांनी घेतली दखल

पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निर्देशानुसार पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर व भाजप नगरसेवकांच्या सूचनेप्रमाणे मनपा हद्दीत गोरगरिबांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. आयुक्तांनी त्यासंबंधी कार्यवाहीचे आदेश दिलेत. त्यामुळे हातावर पोट असणार्‍यांना लॉकडाऊनच्या काळात अन्न मिळणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या कालावधीत हातावर पोट असणार्‍या लोकांना जेवण दुरापास्त झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निर्देशानुसार उपरोक्त वर्गासाठी पनवेल महापालिकेमार्फत अन्नछत्र सुरू करण्याची सूचना मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नितीन पाटील यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली होती. ती आयुक्तांनी मान्य करीत ज्यांना घर नाही म्हणजे जे लोक रात्री रस्त्यावर, फुटपाथवर किंवा रेल्वे स्टेशनवर झोपतात अशांना लॉकडाऊन काळात अन्नछत्राद्वारे मोफत जेवण उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
शहरातील सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात येत आहे की, गरीब व गरजू लोकांना अन्न पुरवण्याची इच्छा असल्यास म्हात्रे यांच्याशी संपर्क साधावा. सामाजिक संस्थांनी स्वतः रस्त्यावर उतरून अन्नवाटपाचे सामुदायिक कार्यक्रम हाती घेऊ नये. कारण अनावश्यक गर्दी झाल्यास कोरोना विषाणू संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. ते लक्षात घेता विनया म्हात्रे यांच्याकडे अन्न सुपूर्द केल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेमार्फत गोरगरीब लोकांना त्या त्या ठिकाणी जाऊन जेवणाचे वाटप करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply