Breaking News

खोपोलीतील बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

लोकसहभागातून खोपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या शहीद अशोक कामते बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन नुकताच रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले. खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी लोक सहभागातून बॅडमिंटन कोर्ट आणि बहुउद्देशीय सभागृह उभारले, ते आदर्शवत आहे, असे मत अधीक्षक दुधे यांनी या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पोलीस अधीक्षक दुधे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण झाले. त्यानंतर बॅडमिंटन कोर्ट, बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन, तसेच नामफलकांचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर केली. सहकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपल्याला यथायोग्य साथ दिली, त्याचसोबत खोपोलीकरांनीदेखील योग्य सहकार्य केले म्हणूच मी या वास्तू उभारू शकलो, असे त्यांनी सांगितले. नवनिर्मित वास्तूंसाठी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दोन लाखांचा निधी मंजूर केले असल्याचे खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी जाहीर केले. जगदीश मरागजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पोलीस उपनिरीक्षक सतीश आस्वर यांनी आभार मानले.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply