Breaking News

कर्जतमधील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील सावेळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे. भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांच्या पुढाकाराने राहुल मसणे आणि मिनेश मसणे यांच्या नेतृत्वाखाली सावेळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या हस्ते मिनेश मसणे, समाधान मसणे, प्रसाद मसणे, भालचंद्र मसणे, सागर मसणे, प्रशांत मसणे, साहिल मसणे, हरेश काटकर, ऋत्विक मसणे, रोशन मसणे, किशोर मसणे, योगेश मसणे, कुलदीप मसणे, संतोष ठमके, दामू मसणे, प्रसाद मसणे, प्रकाश मसणे, निवृत्ती मसणे, कुमार मसणे, तेजस मसणे, यतीश मसणे, देवा मसणे, नरेश मसणे, महेश मसणे, रुपेश मसणे, सुनील मसणे, सुरेश मसणे, अनंत मुने यांच्या हाती भाजपचा झेंडा देण्यात आला. भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुका सरचिटणीस संजय कराळे, कर्जत शहराध्यक्ष बळवंत घुमरे, शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा स्नेहा गोगटे, सोशल मीडिया कोकण संपर्क महिला मोर्चा संयोजक गायत्री परांजपे, तालुका संयोजक मिलिंद खंडागळे, सावेळे जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष अंकुश मुने, युवामोर्चाचे मयूर शितोळे, शहर चिटणीस सर्वेश गोगटे, अल्पसंख्याक सेलचे शहर अध्यक्ष बिलाल आढाळ, प्रज्ञा प्रकोष्ठचे समीर सोहोनी, अभिषेक तिवारी आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply