Breaking News

भाजप ज्येष्ठ कार्यकता सेलची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप ज्येष्ठ कार्यकर्ता पनवेल शहर सेलच्या पदाधिकार्‍यांची शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी 6 वाजता बैठक भाजप मुख्य कार्यालयात झाली. या बैठकीस शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शहर सरचिटणीस अमरिश मोकल यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणार्‍या सुविधांवर चर्चा करण्यात आली तसेच यासंदर्भात काही सुचनाही करण्यात आल्या. बैठकीत महानिंग भद्रशेट्टी यांना शहर मंडल सदस्यपदी नियुक्तीपत्रक प्रदान करण्यात आले. या वेळी सेलचे संयोजन उपेंद्र दिगंबर मराठे, पांडुरंग चांगा मोकल, प्रमोद के. तासकर, उमेश भालचंद्र लिखिते, महानिंग भद्रशेट्टी आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply