पनवेल ः बातमीदार
तळोजा औद्योगिक क्षेत्रात वारंवार अगीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन व तळोजा एमआयडीसी अग्निशमन विभाग यांच्या वतीने सभागृहात औद्योगिक क्षेत्रात आग लागण्याची दुर्घटना घडली तर त्यापासून कशा पध्दतीने बचाव करावा व अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, यासंदर्भात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रृंगारे यांनी थोडक्यात या कार्यक्रमाविषयीची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अंकुश खराडे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे फायर एक्झिट याविषयी सविस्तर माहिती दिली. दीपक दोरागडे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक ए. एम. मोहिते, एमआयडी फायर स्टेशनचे चीफ फायर ऑफिसर एस. एस. वरीक, टीएमएचे संचालक दिलीप परुळेकर आदी उपस्थित होते.