Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धक्का; पीए मिलिंद नार्वेकर यांच्या अवैध बंगल्यावर हातोडा

दापोली ः प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (पीए) मिलिंद नार्वेकर यांचा मुरूडमधील अवैध बंगला तोडण्याचे काम सुरू झाले आहे. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून हे बांधकाम केल्याचा आरोप नार्वेकर यांच्यावर करण्यात आलेला आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा जोरदारपणे उचलून धरलेला होता. दापोलीमधील मुरूडच्या समुद्र किनार्‍यावर नार्वेकर यांचा हा बंगला आहे. नार्वेकर यांच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड-3मध्ये येत होते. या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नार्वेकर यांनी घेतलेली नव्हती. याबाबत किरीट सोमय्या यांनी संबंधित विभागांकडे तक्रार केली होती. सोमय्या यांनी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा सागरी किनारा व्यवस्थापन समिती, महाराष्ट्र सागरी किनारा झोन व्यवस्थापन प्राधिकरण व पर्यावरण खात्याकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नव्हती. मुख्यमंत्री कार्यालयाचा जबरदस्त दबाव असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासन या अनैतिक काम करणार्‍या राजकीय नेत्यांची पाठराखण करीत आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. लोकायुक्त व राष्ट्रीय हरित लवादाकडेदेखील याप्रकरणी सुनावणी सुरू होती. नार्वेकरांच्या बंगल्यासोबतच अन्य बंगल्यांचादेखील यामध्ये समावेश आहे, ज्याबद्दल तक्रार करण्यात आलेली आहे. आता प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यानंतर पहिला क्रमांक हा नार्वेकरांच्या बंगल्याचा लागल्याचे दिसून आले आहे.

पुढचा नंबर अनिल परबांच्या रिसॉर्टचा -किरीट सोमय्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदा बंगला पाडण्याचे काम आता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा, असे ट्विट माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply