Breaking News

अंगणवाडी सेविकांनी परत केले शासकीय कामाचे जुने मोबाइल

पनवेल : वार्ताहर

पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाइलचे वाटप 2019 साली करण्यात आले होते. या मोबाइलची वॉरंटी दोन वर्षे कालावधी असून तो कालावधी मे 2021मध्ये संपला आहे. त्यामुळे देण्यात आलेला मोबाइल हा हँग होत होता. मोबाइल लवकर गरम होत असल्याने त्या मोबाइलवर काम करणे कठीण झाल्याने अखेर शुकवारी (दि. 20) महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल येथील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालयात हे जमा करण्यात आले. देण्यात आलेले मोबाइल हे निष्कृष्ट दर्जाचे आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी नाहक भुर्दंड अंगणवाडी कर्मचार्‍यांना बसतो. याच्यात माहितीसुद्धा अपुरी राहत असल्याने कामही पूर्ण होत नाही. तरी चांगल्या प्रतीचा मोबाइल देण्यात यावा या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडील शासकीय कामाकरिता देण्यात आलेले मोबाइल जमा केले आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply