Breaking News

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍यांसाठी मोफत मोदी एक्स्प्रेस

मुंबई ः प्रतिनिधी

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍यांसाठी मोदी एक्स्प्रेस धावणार आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करीत ही माहिती दिली. विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असणार आहे. ‘दरवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बसेस सोडतो, पण या वर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन पंतप्रधान मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत,’ असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. 1800 नागरिकांसाठी ही ट्रेन सोडण्यात येणार असून दादरहून कणकवली, वैभववाडी व सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्रवासात एक वेळचे जेवणदेखील दिले जाणार आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply