Breaking News

सहकार चळवळ सक्षम करावी

आमदार प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन

महाड : प्रतिनिधी

सहकारी संस्थांमधील पैसा हा सहकारी बँकांमध्येच व्यवहाराला आल्यास सहकार चळवळ अधिक सक्षम होईल, असे प्रतिपादन मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (16 फेब्रुवारी) अलिबाग येथे केले. मुंबईतील सहकारी संस्थांचे कर्मचारी व प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर शनिवारी अलिबाग येथे आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी आमदार प्रवीण दरेकर शिबिरार्थींना मार्गदर्शन करीत होते. पतसंस्थांमधील ठेवी या जिल्हा सहकारी बँकेतच ठेवल्या जाव्यात, तसेच जिल्हा सहकारी बँकेतून सहज व सुलभ मिळणारे कर्ज पतसंस्थांनी घ्यावे, असे त्यांनी सांगितले. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत सहकारी संस्थांचे जाळे असून, येथील सहकारी संस्थांनी सहकारी बँकांमध्ये व्यवहार केल्यास आर्थिक क्षेत्रात सहकाराची मजबूत ताकद उभी राहील, असा विश्वास आमदार दरेकर यांनी व्यक्त केला. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांनी सदर शिबिराचे आयोजन केले होते. त्यांनी या वेळी प्रशिक्षण फी कमी करावी व एसआरओच्या तालुकास्तरापर्यंतच्या अधिकाराची मागणी केली. मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांचीही या वेळी मार्गदर्शनपर भाषणे झाली. या शिबिरात प्रा. अनंत बोंबले, जिल्हा उपनिबंधक पी. एस. सोनावणे, प्रमोद कर्नाड आदींनी मार्गदर्शन केले. या वेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत धिक्कार करण्यात आला.मुंबई बँकेचे संस्थापक नितिन बनकर, आनंदराव गोळे, विठ्ठलराव भोसले, जिजाबा पवार, जयश्री पांचाळ, विष्णू घुमरे यांच्यासह पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी, संचालक, सहकार बोर्डाचे, तसेच मुंबई हौसिंग फेडरेशनचे संचालक या वेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. डी. एन. महाजन, विठ्ठल वाळंजु, श्यामराव भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले

बिग शो मॅचमध्ये देवा थापाकडून नवीन चौहान चीतपट पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह …

Leave a Reply