Breaking News

रुळ तुटल्याने कर्जत-खोपोली लोकल सेवा काही काळ ठप्प

खोपोली ़: प्रतिनिधी

मध्य रेेल्वेच्या केळवली स्थानकानजीक रुळ तुटल्याने गुरुवारी (दि. 26) सकाळी कर्जत-खोपोली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आल्यानंतर काही वेळातच ही रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.

गुरुवारी सकाळी 8.15 कर्जत-खोपोली लोकल केळवली स्थानकाजवळ आली असता रुळ तुटल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर लोकल थांबविण्यात आली. या घटनेची माहिती तत्काळ मध्य रेल्वे प्रशासनाला देण्यात आली, प्रशासनाने रुळ दुरुस्तीचे काम तात्काळ  हाती घेवून पुर्ण केले. त्यानंतर काही वेळातच या मार्गावरील लोकल सेवा सुरू करण्यात आली.

दरम्यान, 12 ते 15 मिनिटे रल्वे सेवा ठप्प झाल्याने मुंबईकडे कामावर जाणार्‍या प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र चालकाच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने अनेक प्रवाशांनी चालकाचे आभार मानत, कौतुक केले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply