Monday , February 6 2023

खालापुरात बेकायदा प्लास्टिक साठा

खोपोली : प्रतिनिधी

राज्यात प्लास्टिक बंदीचा संकल्प असला तरी खालापूर नगर पंचायत हद्दीत अनधिकृतपणे प्लास्टिक साठा करण्यात आला असून  भंगार व्यावसायिक नगर पंचायत प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र आहे.

खालापूर शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय आणि इंग्लीश शाळेच्या मध्यवर्ती भागात रस्त्यालगत भंगार व्यावसायिकाने जागा घेतली आहे. या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून टेम्पोतून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा कचरा आणण्यात येत आहे. हा कचरा तालुक्यासह आसपासच्या कारखान्यातून आणण्यात येतो. या कचर्‍यात प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आहे. अनधिकृतपणे प्लास्टिकचा साठा करण्यात येत असून त्यासाठी नगरपंचायतची कोणत्याही प्रकारची परवानगी या व्यावसायिकाने घेतलेली नाही.

नगरपंचायतीने सदर भंगार व्यावसायिकाला बोलावून कचरा तातडीने हटविण्यास सांगितले होते. मात्र भंगार व्यावसायिकाने कारखान्यातील वेस्टेज प्लास्टिक साठा करणे सुरूच ठेवले आहे.

अधिकार्‍यांना पाठवून प्लास्टिकचा साठा करणार्‍या व्यावसायिकावर काय कारवाई करता येईल, याचा आढावा घेतला जाईल. -सुरेखा भणगे शिंदे, मुख्याधिकारी, नगरपंचायत खालापूर

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply