उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण नगर परिषद हद्दीतील भवरा-मोरा या मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सरकारकडून आठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. काँक्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गणपती मंदिर भवरा-मोरा रोड येथे गुरुवारी (दि. 26) झाला.
या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, नगरसेवक नंदकुमार लांबे, राजेश ठाकूर, नगरसेविका रजनी कोळी, आशा शेलार, जानव्ही पंडीत, यास्मिन गॅस, हितेश शाह, नगरपरिषद नगर अभियंता अनुपकुमार कांबळे, वरिष्ठ अभियंता झुंबर माने, वैभव कन्स्ट्रक्शनचे वैभव देशमुख, माजी उपनगराध्यक्ष चिंतामण घरत, माजी नगरसेविका नंदा माझगावकर, जयराम जाधव, माजी नगरसेवक राजेश कोळी, मदन कोळी, नरेश गावंड, सुरेश शेलार, स्वप्नील मयेकर, महेश ठाकूर, राजेश कदम, सगीर मुकरी, अहुर शेख, बाबू शिट्टाले, देवेंद्र भोईर, चंद्रकांत कोळी, निरा कातकरी, हुचाप्पा दहिसर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार महेश बालदी या वेळी म्हणाले की, उरणमधील महाविकास आघाडीचे नेते नगर पालिकेच्या पारदर्शक कारभारावर टीकाटिप्पणी करत आहेत.
फुल मार्केटसाठी मंजूर झालेला पाच कोटींचा निधी राज्य सरकारने परत घ्यावा यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार करत आहेत, परंतु त्यांच्या अशा द्वेषाच्या राजकारणाला कोणी भीक घालत नाही. उलट शहरातील जनतेला मागील निवडणुकीत जी वचने दिली होती. त्याची पुर्तता भाजप नगर पालिकेच्या माध्यमातून राबवत असलेल्या विविध विकास कामातून शहरातील जनता पाहत आहे. तसेच भवरा, मोरा येथील अबालवृद्धांसाठी हक्काचे गार्डन असावे यासाठी समल डिपार्टमेंटची जागा नगर पालिका आपल्या ताब्यात लवकरच घेणार असून येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्याठी प्रयत्न करणार आहे. तसेच रेंगाळत पडलेल्या बायपास रस्ताचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी सांगून यापुढे ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आपला सेवक म्हणून कार्यरत राहणार आहे, असा विश्वास उपस्थितांना दिला.
दरम्यान, भविष्यात उरण शहराच्या विकासासाठी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे, असे माजी उपनगराध्यक्ष चिंतामण घरत यांनी नमूद करत नगर पालिका राबवित असलेल्या विविध विकास कामांचे कौतुक केले. या वेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली राबवित असलेल्या विविध विकास कामांची प्रसंशा केली.
‘मविआ‘कडून विकास कामात खोडा -आमदार महेश बालदी
राज्यातील आघाडी सरकारकडून विकास निधी उपलब्ध करून न देता, नगर पालिका करत असलेल्या विकास कामात खोडा घालण्याचे काम उरणमधील महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून त्यांनी विविध विकासासाठी देऊ केलेल्या 100 कोटींच्या निधीतून निर्माण झाली आहे. त्याचधर्तीवर उर्वरित भवरा ते मोरा या रस्त्याचे काम वैभव कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे येणार्या काळात उरण शहर हे नव्या रुपात दिसू लागले, असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …