Breaking News

गुन्हेगारी प्रवृत्तीला राजकीय वरदहस्त -दरेकर; जखमी कल्पिता पिंपळे यांची घेतली रुग्णालयात भेट

ठाणे ः प्रतिनिधी

ठाण्यातील कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करीत असताना माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची दोन बोटे, तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. जखमी कल्पिता पिंपळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीवर बोट ठेवले. दरेकर म्हणाले, कल्पिता पिंपळे हाताश झाल्या आहेत. एक महिला अधिकारी अशा प्रकारे अनधिकृत गोष्टी मोडून काढण्यासाठी धाडसाने जाते. फेरीवाल्यामधील गुन्हेगारी प्रवृत्ती जीवघेणा हल्ला करतात, हे दुर्दैवी आहे. ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तिथे राजकीय वरदहस्त आहेच. फेरीवाल्यांच्या या निमित्ताने शोध घेणे आवश्यक आहे. गरीब जे फेरीवाले आहेत ते इमानदारीत काम करतात. पोटाची गुजराण करण्यासाठी काम करतात. काही फेरीवाले दादा झाले आहेत. त्यांचा एरिया, त्या भागात फूटपाथवर फेरीवाल्यांना धंदा लावयला द्यायचे. त्यांच्याकडून हफ्ते जमा करायचे. हफ्ते काही राजकीय पुढार्‍यांना, काही संबंधित अधिकार्‍यांना द्यायचे. ही एक साखळी आहे. फेरीवाल्यांसाठी एक सुस्पष्ट धोरण आणले पाहिजे. दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मोक्कासारखी कारवाई करण्याचे नियम ठेवला तर धाक राहिल, असेदेखील दरेकर यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply