Breaking News

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची घोडदौड; आणखी तीन पदके जिंकली

टोकियो ः वृत्तसंस्था

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताकडून पदकांची लयलूट सुरूच असून मंगळवारी (दि. 31) तीन भारतीय खेळाडूंनी पदकाला गवसणी घातली. यामध्ये नेमबाज अधाना सिंहराजने रौप्यपदक जिंकले तसेच उंच उडीत मरियप्पन थंगवेलू व शरद कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले. भारताच्या खात्यात आता दोन सुवर्ण, पाच रौप्य व तीन कांस्यपदकांसह 10 पदके झाली आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. अधाना सिंहराजने नेमबाजी 10 मीटर एअर पिस्तुल एसएच 1 गटाच्या अंतिम फेरीत चिनी खेळाडूंना कडवी टक्कर दिली. अखेरच्या फेरीत जबरदस्त कमबॅक करताना सिंहराजने 216.8 गुणांसह कांस्यपदक निश्चित केले. उंच उडीत 2016मध्ये मरियप्पन थंगावेलूने सुवर्णपदकाची कमाई केली होती. यंदाही तो जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता, मात्र त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर शरद कुमार कांस्यपदकापर्यंत मजल मारू शकला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply