Breaking News

अफगाणिस्तानसंदर्भात भारताचा टास्क फोर्स सक्रिय

नवी दिल्ली ः अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य स्थापन झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्धच्या कारवाईसाठी वापरू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. हा ठराव मंजूर करण्यात भारताने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तानमधील बदलती परिस्थिती पाहता भारताच्या तात्कालिक प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचा एक टास्क फोर्स तयार केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान गेल्या दोन दशकांपासून पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळामध्ये प्रचंड गुंतवणुकीसह जवळचे भागीदार आहेत. भारताचे मुख्य प्राधान्य हे अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढणे हे आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply