Sunday , February 5 2023
Breaking News

भाजयुमोतर्फे इंडियन आयडॉल विजेते पवनदीप राजन, अरूनिता यांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर

इंडियन आयडॉल विजेते पवनदीप राजन आणि अरूनिता यांचा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आणि सहकारी यांनी विशेष सन्मान केला.

दोघांची भेट भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांच्या सागर निवासस्थानी घडवून आणली. देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचा उचित सन्मान केला. या वेळी या दोन्ही मान्यवरांचा आतापर्यंतचा संघर्ष आणि मिळविलेले यश या विषयी छान गप्पा झाल्या. दोघांनी ही सुमधूर आवाजात गाणी सादर केली. त्यांच्या सुरेल आवाजाचे देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित सर्वच मान्यवरांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राची लेक सायली कांबळे ह्या जोधपूर येथे शूटिंगनिमित्त गेल्या होत्या.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply