अलिबाग : जिमाका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 2 व 3 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. ते पहिल्या दिवशी आपल्या दौर्यात किल्ले रायगडची पाहणी करणार असून, दुसर्या दिवशी अलिबाग येथे जिल्हा नियोजन भवन सभागृहात आढावा बैठक घेणार आहेत.
राज्यपाल कोश्यारी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.05 वाजता महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे येऊन ते शासकीय वाहनाने पाचाड येथील जिजामाता समाधीस्थळाचे दर्शन घेऊन रायगड किल्ल्यावर जाणार आहेत. किल्ल्यावर दिवसभर पाहणी करून ते अलिबाग येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करणार आहेत. दुसर्या दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारीला 10 ते 11 वाजेदरम्यान राज्यपाल जिल्हा नियोजन भवन सभागृहात आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर मांडवा जेटीवरून स्पीट बोटीने मुंबईकडे प्रयाण करतील.
राज्यपालांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा बैठक झाली. या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Check Also
भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …