मुंबई : एकीकडे कोरोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक तो अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याच्या ऐवजी, त्याच्याकडून जबरदस्ती वसुली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसुली करायची आहे. म्हणून हे सगळे नाटक सुरू आहे, अशी टीका महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 14) माध्यमांशी बोलताना केली. वीजबिल थकबाकीची वेळेवर वसुली झाली नाही, तर राज्य अंधारात जाऊ शकते, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे, या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी निशाणा साधला आहे, तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जे सांगितले, त्यातूनच हे लक्षात येते की त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली. जबरदस्ती वसुली करण्यासाठी हा सगळा बाऊ तयार करण्यात येतोय, असेही फडणवीस म्हटले.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …