Breaking News

नवीन पनवेलमधील पाणीपुरवठा सुरळीत करा

महापौरांचे निर्देश

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने लवकरात लवकर उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बुधवारी (दि. 24) दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि सिडको अधिकार्‍यांची बैठक महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बुधवारी दुपारी 2 वाजता महापालिका मुख्यालयात बोलावली होती. या बैठकीस माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक जगदिश गायकवाड, नगरसेविका वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, सिडको आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी महापालिका हद्दीतील नवीन पनवेल भागातील सिडको नोडमध्ये सतत पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. सिडको भागात पाणीपुरवठा करणार्‍या पाइपलाइन जुन्या झाल्याने पाण्याचा दाब जास्त असल्यास त्या फुटण्याची शक्यता आहे. या पाइपलाइन पहिल्या टप्प्यात बदलण्याचे सुचविण्यात आले. याशिवाय काही ठिकाणी तलावातील पाण्याचा वापर करता येण्यासाठी काय करावे लागेल याबाबतही विचारविनिमय झाला.

त्यानंतर नवीन पनवेलमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे उपाय त्वरित योजण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply