ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक
खोपोली : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, वाशीम, अकोला व नागपूर येथील जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे ओबीसीविरोधी धोरण व नाकर्तेपणामुळेच ही वेळ आली आहे. भाजप खोपोली शहर ओबीसी मोर्चाने बुधवार (दि. 15) सकाळी दीपक हॉटेल चौकात महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने, आंदोलन केले.
भाजपचे खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, सरचिटणीस हेमंत नांदे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुनिल नांदे, ईश्वर शिंपी, दिलीप पवार, चिटणीस स्वाती बिवरे, सुमिता महर्षी, राकेश दबके, अनिता शहा, अपर्णा साठे, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर, सूर्यकांत देशमुख, सुधाकर दळवी, ध्रुव मेहंदळे, सागर काटे व अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.