रोहे ः प्रतिनिधी
समाजात आजही काही ठिकाणी लग्न कार्यात मोठा खर्च केला जातो. समाजातील सामान्य लोकांना हा खर्च परवडणारा नसतो. आता या पुढे समाज बांधवानी लग्न कार्य एका दिवसात उरकुन समाजात चांगला आदर्श ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुणबी समाजोन्नती संघाचे मुंबई प्रतिनिधी शंकरराव भगत यांनी रविवारी (दि. 8) धाटाव येथे केले. कुणबी समाजोन्नती संघाच्या रोहा धाटाव ग्रुपच्या वतीने रविवारी तळाघर येथील महादेव मंदिर सभागृहात गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला बचत गट यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शंकरराव भगत उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. युवकांनी व्यसनापासून दूर राहून, नोकरीच्या चांगल्या संधी शोधण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कुणबी समाजोन्नती संघाचे मुंबई प्रतिनिधी सुरेश मगर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मंगेश सानप, माधव आग्री, डॉ. सागर सानप यांची समयोचीत भाषणे झाली. सूत्रसंचालन सचिव सतिष भगत यांनी केले. विष्णू लोखंडे, मधुकर बामुगडे, धाटाव ग्रुप अध्यक्ष ज्ञानेश्वर सांळुखे, उपाध्यक्ष लक्ष्मण मोहिते, खजिनदार हरिचंद्र माने, यशवंत भोकटे, गजानन लोखंडे, केशव भोकटे, महेश बामुगडे, दत्ता चव्हाण, परशुराम भगत, रमेश मोरे, योगेश बामुगडे, दिपक जमदाडे, प्रकाश भगत, रिया भगत, अमित मोहीते, मारूती लहाने, कल्पीता सांळुखे, दगडू बामुगडे, अनंत मगर, महेश भगत, मंगेश देवकर, मुकेश भोकटे, अरविंद मगर, अनिल पोटफोडे, सचिन पवार, संतोष माने, उत्तम माने, दिपेश सांळुखे यांच्यासह कुणबी समाज बांधव या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.