Breaking News

सुक्या मच्छीचा दुष्काळ

कोळी बांधवांची खळी पडली ओस

रेवदंडा : प्रतिनिधी

स्थानिक खाडीत मच्छीमारी करणार्‍या कोळी बांधवांच्या जाळ्यात फार थोडी मच्छी सापडत असल्याने  रेवदंडा परिसरात सुक्ुया मच्छीचा दुष्काळ जाणवत आहे. त्यामुळे पर्सीयन जाळ्याच्या बोटी व चक्रीवादळ यांच्या विळख्यात सापडलेल्या कोळी बांधवाची अवस्था बिकट झाली आहे.

स्थानिक कोळी बांधव खाडीलगत तसेच समुद्रात काही अंतरावर मच्छीमारी करतात. खोल समुद्रात जाऊन पर्सियन जाळयाच्या बोटी तसेच गेल्या वर्षी चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोळी बांधवाच्या जाळयात मच्छी सापडत नसल्याची तक्रार आहे. जाळ्यात म्हावरं गावत नसल्याने मच्छीमार बांधवांची खळी ओस पडलेली दिसत आहेत. त्यामुळे सुकट, बोंबील, वाकटी, सुकी आंबाड आदी सुकी मच्छीसुध्दा या वर्षी उपलब्ध नाही.

येथील आग्राव, चौल, रेवदंडा, थेरोंडा, कोर्लई, बोर्ली, साळाव परिसरात सुक्या मच्छीच्या व्यवसायातून प्रतिवर्षी लाखोंची उलाढाल होत असते. या परिसरातून संपुर्ण रायगड जिल्ह्यांतील आठवडा बाजारात सुकी मच्छी विक्रीसाठी कोळी महिला जातात. परंतु या वर्षी सुकी मच्छी नसल्याने त्यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. स्थानिक सुकी मच्छी उपलब्ध नसल्याने येथील  व्यापारी पालघर, वसई आदी भागातून सुकी मच्छी आयात करतात, त्यावर कोळी महिलांचा व्यवसाय टिकून आहे. तसेच जिल्ह्यातील आठवडा बाजारात काही प्रमाणात सुकी मच्छी विक्रीसाठी दिसून येते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply