मुरूड : प्रतिनिधी
मुरूडजवळील प्रसिद्ध काशिद समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 18) घडली. पोहायला उतरलेल्या या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही बाब किनार्यावरील जीवरक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दोघांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.
सुरजित नस्कर (वय 25) व पलट्टूसूत्रधार (वय 35) अशी बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. हे दोघेही पर्यटक मूळचे पश्चिम बंगालचे असून पुणे येथील एका कंपनीत कामास होते. शनिवारी सकाळी पुणे येथून एका लक्झरी बसमधून 30 लोकांचा ग्रुप काशिद समुद्रकिनारी फिरण्यासाठी आला होता. या पर्यटकांना किनार्यावरील जीवरक्षकांनी समुद्रात न उतरण्याबाबत सूचना दिल्या होत्या, मात्र या पर्यटकांपैकी दोन जण पोहता पोहता खूप दूरवर निघून गेले. दोघांनाही समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. जीवरक्षकांनी यांना पाण्याबाहेर काढत किनार्यावर आणले, मात्र ते बेशुद्धावस्थेत होते. दोघांनाही बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …