नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात अडीच कोटी लोकांना लसींचे डोस दिल्यानंतर रात्री 12 वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचा ताप वाढला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
पंतप्रधानांनी शुक्रवारची देशाची लसीकरणाची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोव्यातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी लसीकरणाच्या विक्रमावरून विरोधकांवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, लोकांनी राज्यांमध्ये कोरोना लसीकरण महा अभियानात उत्साहाने सहभाग घेतला. बिहारमध्ये जास्तीत जास्त कोरोना लसींचे डोस देण्यात आले असून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची सर्वांत मोठी भेट दिली आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …