नागोठणे : प्रतिनिधी : बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 यांच्या विद्यमाने येथील शिवाजी चौकात शनिवारी (दि. 27) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी 9 वाजता बौद्धाचार्य किसन शिर्के, हेमंत जाधव, नितीन गायकवाड, मयूर गायकवाड, विलास कांबळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण, बुद्ध पूजापाठ करून या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. दुसर्या सत्रात सायंकाळी 5 वाजता गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची काढण्यात आलेली मिरवणूक संपूर्ण शहरात फिरविण्यात आली. रात्री 8 वाजता व्ही. के. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. नीलकंठ शेरे, चंद्रकांत गायकवाड, प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, शांताराम गायकवाड, संतोष गायकवाड, दीपक दाभाडे, सुजित शेलार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर नागपूरचे मनोजराजा गोसावी आणि अश्विनीताई राजगुरू (अमरावती) यांच्यात कव्वालीच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमानंतर दिवसभराच्या महोत्सवाची सांगता करण्यात आली.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …