Breaking News

तलवारबाजीत पनवेलची चमक

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई उपनगर फेन्सिंग असोसिएशन आयोजित बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर चषक तलवारबाजी स्पर्धा मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 20) नालंदा अ‍ॅकॅडमी इंग्लिश स्कूल गोराई-2 बोरिवली येथे पार पडल्या. यामध्ये मुलांमधील तिसरी चॅम्पियन ट्रॉफी, चॅम्पियन एसक्राईन पनवेल यांना मिळाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुक्त शिवानंद शेट्टी, श्रीपाद प्रभु, श्री पावशे गुरुजी व नालंदा लॉ कॉलेजचे मुख्याध्यापक, डी. एड कॉलेजच्या मुख्याध्यापिका व नालंदा शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. चौधरी सर उपस्थित होते.

मुंबई उपनगर, पनवेल, मुंबई सिटी, नवी मुंबई, रायगड, बदलापूर येथून 210 मुलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक श्री. मिलिंद ठाकूर सर व श्री. वैभव पेटकर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

निकाल : 10 वर्षांखालील मुले व मुली – ब्राँझ मेडल आदित्य गोवडा (फॉइल इवेंट), ब्राँझ मेडल कैवल्य येडगे (सेबर इवेंट), ब्रँझ मेडल सिद्धार्थ जावरे (सेबर इवेंट); 12 वर्षांखालील मुले व मुली – गोल्ड मेडल समीक्षा संतोष पाटील (फॉइल इवेंट), ब्राँझ मेडल रिद्धी पाटील (फाइल इवेंट), सिल्वर मेडल आर्यन सुतार (फॉॅइल इवेंट), सिल्वर मेडल समीक्षा संतोष पाटील (सेबर इवेंट), ब्रॉझ मेडल हंसनी पाटील (सेबर इवेंट); 14 वर्षांखालील मुले व मुली – गोल्ड मेडल निमिषा थवई (फॉइल इवेंट), ब्राँझ मेडल सोनम सिंग (सेबर इवेंट), गोल्ड मेडल क्षितीज आगलावे (सेबर इवेंट), ब्राँझ मेडल प्रेम पाटील (इपी इवेंट), ब्राँझ मेडल वरद परांजपे (इपी इवेंट); 17 वर्षेखालील मुले व मुली – सिल्वर मेडल रितेश देशमुख (फॉइल इवेंट), ब्राँझ मेडल अथर्व घाडी (फॉइल इवेंट), गोल्ड मेडल अथर्व घाडी (इपी इवेंट), सिल्वर मेडल शिवानी घोरपडे (फॉइल इवेंट), ब्राँझ मेडल सुप्रिया शका (फॉइल इवेंट); 20 वर्षांखालील मुले व मुली – ब्राँझ मेडल ओमकार अरेकर (सेबर इवेंट), गोल्ड मेडल आकांक्षा परब (फॉइल इवेंट); तसेच उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार 12 वर्षांखालील मुली – समीक्षा संतोष पाटील; 17 वर्षांखालील मुले – अथर्व घाडी.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply