Breaking News

इपिक फ्युजन हेल्थ केअरतर्फे डिजिटल आरोग्य तपासणी शिबिर

उरण : रामप्रहर वृत्त

येथील न्यू इंग्लिश स्कूल मोरा येथे मोरा मच्छीमार सहकार सोसायटी व महेश बालदी मित्र मंडळ यांच्या वतीने आणि इपिक फ्युजन हेल्थ केअर यांच्या वतीन दिनांक 15 व 16 ऑगस्ट रोजी मोफत डिजिटल आरोग्य तपासणी शिबिराचे  आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला उरणचे आमदार महेश बालदी यांनी रविवारी (दि. 15) भेट दिली.

या वेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, नगरसेवक राजू ठाकूर, नंदू लांबे, नगरसेविका रजनी कोळी, प्रियांका पाटील, जान्हवी पंडित, दमयंती म्हात्रे, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजपचे उत्तर रायगड अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जसिम गॅस, युवा मोर्चा उरण शहर अध्यक्ष निलेश पाटील, मोरा मच्छीमार सहकार सोसायटीचे चेअरमन प्रवीण कोळी, माजी नगरसेवक राजेश कोळी, ज्येष्ठ कार्यकर्ते मदन कोळी, ज्येष्ठ कार्यकर्त्या नंदा कोळी, हितेश शहा, मनन पटेल, जगदिश पाटील, स्वप्नील पाटील आदींसह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या शिबिरामध्ये  मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रोल, हृदय तपासणी, इसीजी, महिलांकरिता ब्रेस्ट कॅन्सर तपासणी अशा विविध आजारांची तपासणी केली जात आहे. रविवारी अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply