उरण ः वार्ताहर
उरण तालुक्यातील शेकाप, काँग्रेस, पक्षातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम रविवारी (दि. 15) सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमास सर्व जिल्हा पदाधिकारी, उरण तालुका पदधिकारी, उरण शहरातील नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उरण तालुक्यातील गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, उरण तालुका युवा पदाधिकारी, उरण शहर युवा पदाधिकारी, उरण तालुका महिला कमिटी, उरण शहर महिला कमिटी, बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुख, उरण तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर व भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा यांनी दिली.