Breaking News

‘म्युकरमायकोसिस’साठी तुटपूंजी मदत

राज्य शासनाकडून केवळ दीड लाखांची योजना

खारघर : प्रतिनिधी

म्युकरमायकोसिस या कोरोनानंतर उद्भवणार्‍या बुरशीजन्य आजाराच्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन केला जाईल, असे राज्य शासनाने जाहीर केले आहे. मात्र या योजनेची मर्यादा दीड लाख असुन या आजारावरील खर्च किमान आठ लाखांपर्यंत असल्याने त्यामुळे या आजाराने बाधीत झालेल्या रुग्णांचा नातेवाइकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

वातावरणात जिवाणू, विषाणु व बुरशी असे सूक्ष्म जंतु असतात.ते विविध आजारांना कारणीभुत ठरतात. म्युकरमायकोसिस व असाच बुरशीजन्य आजार आहे. साधारणतः त्याची लागण होण्याची कारणे आहेत. रोगप्रतिकारशक्ती कमी असणे, रक्तातील साखरेची पातळी अनियत्रंतीत वाढणे व अतिमात्रेची स्टिरॉईड दीर्घकाळ घेणे, संसर्ग शरीराच्या कुठल्या भागात झाला आहे. तावरून या आजाराची लक्षणे दिसतात.

म्युकरमोयकोसिस संसर्ग झालेल्या रुग्णाला एम्फेटेरेसिन बी इंजेक्शन दिले जाते. त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नाही. म्युकरमायसोसिसचे जिल्हात तीन रुग्ण आढळले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यातील इतर ठिकाणच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात  म्युकरमोयकोसिसचे केवळ तीन रूग्ण आहेत. या रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी जिल्हा तसेच पनवेल महानगरपालिकेच्या रुग्णालयात इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

एका रुग्णावर आठ ते दहा लाख रुपये खर्च

एका रुग्णाला किमान आठ लाख रुपयांचा खर्च उपचारासाठी येतो. किमान महिनाभर तरी रुग्ण पूर्णपणे बारा होण्याचा कालावधी लागतो. म्युकरमोयकोसिसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला एम्फेटेरेसिन बी हे महागडे औषध लागते. विशेष म्हणजे सर्व औषधांचा खर्च लाखोंच्या घरात आहे.

नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण

रायगड जिल्ह्यात रुग्ण संख्येने एक लाखांचा टप्पा गाठला आहे. यामधील बहुतांशी रुग्ण बरेदेखील झाले आहेत, मात्र बरे झालेले रुग्णांनादेखील म्युकरमायसोसिसचा धोका असल्याने या रुग्णांना व विद्यमान रुग्णांना या आजाराबाबत भीती वाटु लागली आहे. सद्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख 24 हजार 865 एवढी आहे. तर मृत्यू झालेले रुग्ण 2891 आहेत. सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यात 7894 रुग्ण आहेत.

म्युकरमायसोसिस आजार टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. घरगुती तयार केलेले मास्क पुर्ण ड्राय झाल्यावरच वापरले गेले पाहिजे. जिल्ह्यात म्युकरमायसोसिसच्या तीन रुग्णांपैकी एका रुग्णांचा मृत्यू झाला.

-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply