Breaking News

ट्रकचालकांच्या डुलकीवर सेन्सर्सचा उपाय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अभिनव प्रयोग

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात हा चिंतेचा विषय आहे. या अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्याने त्यावर तोडगा काढणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले असून त्यानुसार ट्रकचालकांच्या चुकांमुळे किंवा त्यांना ट्रक चालवताना डुलकी लागल्यामुळे होणार्‍या अपघातांना आवर घालण्यासाठी लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार आहेत.
रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी गडकरींनीच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा गटाची स्थापना केली आहे. दर दोन महिन्यांनी या गटाची बैठक होते आणि त्यात संभाव्य योजनांवर चर्चा केली जाते. मंगळवारी झालेल्या या गटाच्या बैठकीत गडकरींनी सेन्सर्स बसविण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे ट्रकचालकांचे ड्रायव्हिंगचे तास निश्चित करण्यात येणार आहेत. या संदर्भात सर्व राज्य सरकारे आणि जिल्हाधिकार्‍यांनादेखील निर्देश दिले जातील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रस्ते अपघातात होणार्‍या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला हवी हे स्पष्ट करतानाच गडकरींनी या बैठकीमध्ये रस्ते सुरक्षा गटाच्या सदस्यांना या संदर्भात लवकरात लवकर धोरण तयार करण्याचे सूचित केले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply