पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदी दशरथ म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 22) पनवेल येथे झालेल्या भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठकीत म्हात्रे यांची नियुक्ती जाहीर केली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार महेश बालदी, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, विनोद साबळे, वसंत भोईर, दीपक बेहेरे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज भुजबळ, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आश्विनी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह जिल्हा व तालुका मंडलातील पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी दशरथ म्हात्रे यांनी भाजपचे पनवेल तालुका मंडल सरचिटणीस म्हणून जबाबदारी यशस्वीपणे बजावली आहे. युवा संघटनात्मक कार्याची उत्तम जाण तसेच दांडगा जनसंपर्क त्यांच्याकडे आहे. समाजातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा सतत पाठपुरावा राहिला आहे. त्यामुळे ओबीसी सेलच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Check Also
खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
खारघर : रामप्रहर वृत्तखारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत बास्केटबॉल स्पर्धेचेआयोजन करून करण्यात आले.तरुण …