Breaking News

कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील घोट येथील हायकल लिमिटेडमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यानिमित्त कंपनीच्या गेटजवळ जय भारतीय कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 9) करण्यात आले.

नामफलक अनावरण सोहळ्यास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, जय भारतीय कामगर संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवींद्र नाईक, पांडुरंग पाटील, सरचिटणीस मोतीलाल कोळी, रवींद्र कोरडे, भाजप प्रभाग क्रमांक 2चे अध्यक्ष कृष्णा पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर, बंडूशेठ गोंधळी, प्रशांत कदम, नारायण पाटील, नथुराम पाटील, सतिश घरत, संतोष शिर्के, सरपंच तुकाराम पाटील, राम पाटील आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारलेल्या कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असा विश्वास दिला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply