Breaking News

वेश्वी ग्रामपंचायतीसाठी ग्रामविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल

उरण ः रामप्रहर वृत्त – वेश्वी ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीतर्फे वॉर्ड क्र. 2मधून अजित पाटील, सोनाली पाटील, सुनील तांबोळी, विलास पाटील, गणेश पाटील, सविता पाटील, तर वॉर्ड क्र. 3मधून संदीप पाटील, नूतन मुंबईकर, प्रमिला मुंबईकर यांनी मंगळवारी

(दि. 29) निवडणूक निर्णय अधिकारी भस्मे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.

या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, राजू ठाकूर, शशी मुंबईकर, रामनाथ मुंबईकर, श्याम मुंबईकर, प्रभाकर मुंबईकर, विद्या मुंबईकर, जय मातादी दिघोडेचे अध्यक्ष मयूर घरत, अशोक पाटील, दीपेश मुंबईकर, चंद्रकांत पाटील, विराज कडू, राहुल कडू, सचिन पाटील, नंदकुमार पाटील, प्रणय वाणी आदींसह ग्रामविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply