अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये अधिवास असलेला मनमोहक व सुंदर तिबोटी खंड्या या पक्षाला रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. पर्यटन दिनाचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
जिल्ह्यात मे ते ऑक्टोबरपर्यंत तिबोटी खंड्या या पक्षाचा रहिवास आढळून येतो. जंगलात ओढा, तलाव, मातीच्या कड्यात जिथे जमीन भुसभुशीत असेल तिथे एक मीटर घरटे करून हा पक्षी राहता. आकार व चमकदार रंगामुळे तो वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. या पक्षाच्या तळव्याला तीन बोट असल्याने याला तिबोटी खंड्या असे म्हणतात.
तिबोटी खंड्या रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मे-जूनमध्ये प्रजननासाठी येतो आणि सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान परत जातो. ते आपल्या घरट्यात सरासरी पाच अंडी घालतात. या पक्षांचे आयुष्यमान चार ते पाच वर्षांच असते. तिबोटी खंड्याला भेडसावत असलेला मुख्य धोका म्हणजे त्यांचा अधिवास नष्ट होणे व मानवी हस्तक्षेप आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
Check Also
आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …