Breaking News

खालापूरात भाजप पदाधिकार्‍यांनी घेतली नवनियुक्त अधिकार्‍यांची भेट

खालापूर : प्रतिनिधी

खालापूरचे नवनियुक्त तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांच भाजप पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेमध्ये खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणी अभियान व मतदार ओळखपत्र यात येणार्‍या अडचणीचे मुद्दे भाजपचे युवा नेते शक्ती केंद्र प्रमुख राहुल जाधव यांनी मांडले. तसेच यासाठी कॅम्पचे आयोजन करावे, असे भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी यांनी सांगितले. मुख्याधिकारी अनुप दुरे यांना सुभाष नगरचा रस्ता (रेल्वे गेट, मस्कॉ गेट ते जाधव मामा यांच्या घरापर्यंतचा रस्ता-जाधव मामा चौक) संदर्भात राहुल जाधव यांनी माहिती दिली. ग्रामस्थांनी नवीन रस्त्यासाठी केलेले विरोध, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेट्टे यांनी 50 वर्षे जुन्या रस्त्या डांबरीकरण केले आहे तसेच हा रस्ता सार्वजनिक नस्ता म्हणून घोषित करण्यात यावा. यासाठी खोपोली नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेला ठराव. सुभाषनगर ग्रामस्थांनी या रस्त्याला खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्व. सखाराम गेणू जाधव मार्ग असे नामकरण करण्यात यावे. या मागणीची माहिती दिली. सुभाषनगर येथील स्वच्छता व आरोग्य संदर्भात थोडक्यात चर्चा करण्यात आली. श्रीकांत पुरी यांची शहरातील नगर परिषदेचे रखडलेल्या प्रकल्प व भविष्यातील उपाययोजना संदर्भात चर्चा झाली. शहरातील बाजारपेठ, समाज मंदिर रोड येथील समस्या खोपोली शहर सरचिटणीस ईश्वर शिंपी यांनी मांडले. वृक्षारोपण व यांचे संगोपन कार्यक्रम, पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमाचा माध्यमातून बांधलेल्या छोट्या बंधार्‍यांबाबत माहिती चिटणीस गोपाळ बावस्कर आणि शक्ती केंद्र प्रमुख संजय म्हात्रे यांनी दिली. खोपोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याबरोबर विविध विषयांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या प्रमुख अधिकार्‍यांचे स्वागत भाजपचे युवा नेते शक्ती केंद्र प्रमुख राहुल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, खोपोली शहर सरचिटणीस ईश्वर शिंपी, चिटणीस गोपाळ बावस्कर, शक्ती केंद्र प्रमुख संजय म्हात्रे, दिलीप देशमुख, भाजप वैद्यकीय सेल खोपोली शहर सह-संयोजक विकास खुरपुडे यांनी केले.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply